थर्ड गेट आरओबीला दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याची मागणी कन्नड संघटनांची केली आहे.
बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे पुलाला कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांचे नाव द्यावे, अशी मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली.
सोमवारी कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त तयारी व्यवस्थांची आढावा बैठक झाली त्यावेळी कन्नड संघटनांनी ही मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरील निवेदनाला उत्तर देताना तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या नामकरण मागणी बाबत रेल्वे विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बेळगावच्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तिसरे गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) टिळकवाडी बेळगाव येथे नव्याने बांधलेल्या रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
रोड ओव्हर ब्रिज थर्ड गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) च्या बांधकामाची पायाभरणी 6 जानेवारी 2019 रोजी दिवंगत माजी रेल्वे मंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या हस्ते करण्यात आली होती.
Suresh Angadi
Hari mandir bridge