Friday, November 15, 2024

/

बेळगावच्या ढोल ताशा पथकांचा आजवरचा प्रवास

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : शिवजयंती असो वा गणेशोत्सव.. बेळगावमध्ये घुमणाऱ्या ढोल ताशांचा आवाज प्रत्येकाच्या कानात घुमत आहे. २०१४ साली सर्वप्रथम बेळगावमध्ये घुमलेला ढोल ताशांचा आवाज आज पुण्याच्या धर्तीवर विकसित होताना दिसत आहे.

भारतातील अनेक सांस्कृतिक चळवळींची परंपरा असलेल्या पुण्यात ढोल ताशा पथकं हि प्रत्येक सार्वजनिक उत्सवांची परंपरा झाली आहेत. याच धर्तीवर बेळगावात शिवजयंती आणि गणेशोत्सव म्हटलं कि आवर्जून उल्लेख केला जातो तो ढोल ताशा पथकांचा! सध्या यत्र-तत्र-सर्वत्र दिसणाऱ्या या पथकांची सुरुवात झाली तरी कुठून? इतक्या मोठ्या जनसमुदायाला भुरळ पाडणारी हि संकल्पना कोणाची? आणि बेळगावमध्ये ढोल यशाची संस्कृती कशी रुजली यासंदर्भात बेळगावमधील ढोल ताशा पथकातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेले आशुतोष कांबळे यांच्यासोबत ‘बेळगाव लाइव्ह’ने घेतलेला आढावा…

बेळगावात अनेक सार्वजनिक उत्सवात अलीकडे ढोल ताशा पथकांचा आवाज घुमत आहे. २०१३ साली सर्वप्रथम ढोल ताशांचा आवाज बेळगावमध्ये शिवजयंती उत्सवादरम्यान घुमला होता. यावेळी बेळगावमध्ये एकही अधिकृत असे ढोलताशा पथक नव्हते. २०१४ आणि २०१५ या सालात पुण्यातील गणेशोत्सवाच्या धर्तीवर सह्याद्री गर्जना या पुण्यातील ढोलताशपथकाने सादरीकरण केले. आणि इथूनच बेळगावच्या ढोल ताशा पथकाच्या प्रवासाला प्रारंभ झाला.

२०१५ मध्ये बेळगावमध्ये सर्वप्रथम नरवीर ढोलताशपथक आणि शिवगर्जना ढोलताशा पथकाची स्थापना झाली. खासबाग आणि जुनेबेळगाव परिसरातील या ढोल ताशा पथकांनी बेळगावकरांची मने जिंकली. २०१९ साली झालेल्या बेळगावच्या सुवर्णमहोत्सवी शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मवीर संभाजी चौकात ऐतिहासिक असे वादन आणि ध्वजपथकाचे सादरीकरण पार पडले. नरवीर ढोलताशा पथकाच्या माध्यमातून बालिका आदर्श शाळेच्या विद्यार्थिनींचे रणरागिणी पथक देखील या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. २०१५ नंतर बेळगावमध्ये अनेक ढोल ताशा पथकांची स्थापना झाली. मोरया, सिंहगर्जना, वज्रनाद, छावा, जगदंब यासारख्या १७ ते १८ ढोल ताशा पथकांनी विविध सार्वजनिक मंडळांसाठी वादन सुरु केले.Dhol pathak bgm

ढोल ताशा पथकात कमीतकमी ६० वादकांचा सहभाग आवश्यक आहे. यामध्ये ३० ढोल, ७ ताशा आणि १ टोलगाडा तसेच झांज आणि मानाच्या ध्वजाचा सहभाग असतो. ढोलताशा हे रणवाद्य आहे. चामड्यापासून बनविण्यात आलेल्या या वाद्याच्या पारंपरिक वादनासाठी पारंपरिक ७ ते ८ असे हात आहेत. पारंपरिक ७ ते ८ ठेक्यांवर ढोल वाजविणे, ताशाचा ठेका धरणे आणि ध्वजाची अदब आणि नजाकत राखणे याचबरोबर पारंपरिक वेशभूषा हि ढोलताशा पथकाची वैशिष्ट्ये आहेत. झांझ पथक देखील यापैकीच एक आहे मात्र यामध्ये फायबरच्या ढोलचा वापर केला जातो. याचबरोबर लेझीम आणि पारंपरिक वाद्यांचा यात समावेश असतो.

ढोलताशा पथकात वादन करणाऱ्या वादकांना ढोल ताशा वादनाचे सादरीकरण करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. आपली कला प्रेक्षकांसमोर दाखविण्यासाठी वादकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. उत्सवा आधी दीड ते दोन महिने सराव करणारी पथके उत्सवादरम्यान प्रत्येकपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यासाठी अशा पथकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.Taal jallosh 2022

जेणेकरून या पथकातील वादकांना पुन्हा नवी प्रेरणा मिळेल आणि प्रेक्षकांना एका ठिकाणी या वादन अनुभवता देखील येईल, बेळगावमध्ये यापूर्वी असे एक व्यासपीठ तयार करून देण्यात आले होते. मात्र यंदा आमदार अनिल बेनके यांनी बेळगावकरांसाठी आणि ढोल ताशा पथकांसाठी भव्य ढोल ताशा पथक स्पर्धांचे आयोजन केले असून या माध्यमातून बेळगावमधील अनेक ढोल ताशा पथकांचे वादन बेळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे, असे आशुतोष कांबळे यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.