Wednesday, February 12, 2025

/

सौन्दत्तीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीचे आमदार  आणि कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद चंद्रशेखर मामनी वय 56 वर्षे यांचे आजाराने निधन झाले आहे.

बेंगळुरू येथील मणिपाल इस्पितळात त्यांनी शनिवारी रात्री शेवटचा श्वास घेतला त्यांच्यावर गेल्या कित्येक दिवसापासून उपचार सुरू होते काही दिवसापूर्वी त्यांना उपचारासाठी चेन्नईत देखील हलवण्यात आले होते. लिंगायत पंचमशाली समाजातील बेळगाव जिल्ह्यातील ते एक मोठे नेते होते.Mamni

उमेश कत्ती यांच्या निधनानंतर बेळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या लिंगायत पंचमसली समाजाच्या नेत्याचे निधन झाले आहे.

आनंद(विश्वनाथ) मामनी यांचा जन्म 18 जानेवारी 1966 रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे झाला त्यांच्या वडीलांचे नाव चंद्रशेखर मल्लिकार्जुन मामनी तर आई श्रीमती गंगाम्मा मामनी होय ते सौंदत्तीतील प्रतिष्ठित कुटुंबातले व्यक्तिमत्त्व होते त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक एक सौंदत्ती येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण के एल ई स्कूल सौंदत्ती येथे पूर्ण झाले.

त्यांनी सौन्दत्ती येथील एस व्ही बेल्लोबी कॉलेजमध्ये आपले पदवीचे बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आनंद यांना शेतीची आवड होती आणि राजकारणात येण्यापूर्वी ते शेती करत होते 1984 ते 1999 पर्यंत ते कापसाचा व्यापार करत होते आनंद मामनी यांच्या पश्चात पत्नी सौ रचना मामनी तसेच एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
त्यांचे पार्थिव बंगळुरू वरून सौंदत्तीला येणार असून दुपारी सौंदत्ती येथे लिंगायत समाजाच्या विधीनुसार अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.