बेळगाव येथील जुन्या गांधीनगर पुलावर पतंगाच्या मांजा दोऱ्याने मुलाचा गळा चिरल्याने एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बेळगाव बाजारपेठेत दिवाळी सणासाठी कपडे खरेदी करून 6 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत दुचाकीवर बसला होता, तो हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी जवळील अनंतपुर या आपल्या गावी परतत असताना रविवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
फ्रुट मार्केट जवळ झालेल्या या घटनेचत मांजाने गळा चिरल्याने सदर मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वर्धन ईरन्ना बॅली असे या घटनेत मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.
वडिलाच्या दुचाकीवर बसलेल्या वर्धन गळ्यात मांजा अडकल्याने गळा चिरला गेला व त्याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला इस्पितळात दाखल करून या चिमुरड्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न झाले मात्र त्याला यश आले नाही
रविवारी बसकाळी त्याच ठिकाणी मांजाच्या धाग्याने गळफास लागल्याने हलगा येथील जोतिबा हणमंताचे हा युवक जखमी झाला होता थांबला आणि त्याला वेळीच उपचार मिळाले.
बेळगाव शहरातील गांधीनगर भागांत पतंग उडवणाऱ्यांची संख्या भरपूर आहे त्यामुळे आता हायवे वरून दुचाकी चालवताना सावधानता बाळगावी लागणार आहे धोकादायक मांजा बंदीची बेळगावात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.