Friday, September 13, 2024

/

उत्तर कर्नाटकासाठी वेगळा वफ्फ बोर्ड हवा

 belgaum

उत्तर कर्नाटकासाठी वेगळे स्वतंत्र व बोर्ड स्थापण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन आज उत्तर कर्नाटक अंजुमन -ई -इस्लाम हुबळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

उत्तर कर्नाटकसाठी वेगळे स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्यात यावे आणि ते देखील शक्यतो बेळगाव, धारवाड किंवा विजापूर येथे स्थापण्यात यावे. राज्यात नव्याने स्थापनेत येणाऱ्या सात विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ उर्दू असावे. जे हावेरी, कोप्पळ अथवा बिदर येथे सुरू करावे. हुबळी विमानतळानजीक असलेल्या गोकुळ गावाच्या ठिकाणी सरकारी जमीन निश्चित करून तेथे लवकरात लवकर वक्फ भवनाची उभारणी करण्यात यावी.Seprate walf board nk

हुबळीला हज यात्रेसाठीचे प्रारंभ केंद्र बनवून गेल्या अनेक वर्षापासूनची उत्तर कर्नाटकातील हज यात्रेकरूंची मागणी पूर्ण केल्याबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभारी आहोत. आता आमच्या उपरोक्त मागण्यांची देखील लवकरात लवकर पूर्तता करावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात समोर आहे.

निवेदन सादर करण्यापूर्वी उत्तर कर्नाटक अंजुमन इस्लाम संघटनेतर्फे मागण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी अंजुमन -ई -इस्लाम हुबळीचे अध्यक्ष एच. एम. कोप्पद यांच्यासह सेक्रेटरी जे. एस. हडलगी, खजिनदार ए. बी. अत्तार एम. बी. नालबंद, एम. एम. घीवाले आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.