Wednesday, January 15, 2025

/

मराठा युवक संघाची रोलर स्केटिंग स्पर्धा

 belgaum

मराठा युवक संघ आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्यावतीने आयोजित खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा -2022 काल रविवारी उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली.

हॉटेल पंचामृत समोरील रोडवर मराठा कॉलनी येथे आयोजित या रोलर स्केटिंगस्पर्धेत जवळपास 160 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घघाटन प्रमुख पाहुणे किरण ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नगरसेवक नितीन जाधव, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, उमेश कलघटगी, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, दिनकर घोरपडे, शिवाजी हंगिरर्गेकर, अप्पासाहेब गुरव, कन्नूभाई ठक्कर, रमेश हन्नेकेरी, अजित कोकणे, शिवाजी हंडे, नारायण किडवाडकर, श्रीकांत देसाई, शेखर हंडे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आदींसह स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या समयोचीत भाषणानंतर बाळासाहेब काकतकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा दर वर्षी भरवण्यात येतील, असे जाहीर केले

सदर रोलर स्केटिंग स्पर्धेचा यशस्वी स्केटिंगपटू पुढीलप्रमाणे आहेत. क्वाड स्केटिंग : 5 ते 7 वयोगट मुले
-वीर मोकाशी 2 सुवर्ण, अन्वित शिंगाडी 2 रौप्य, शिवाय पाटील 1 कांस्य, आदिेश हल्याल 1 कांस्य. 5 ते 7 वयोगट मुली -झिया काजी 2 सुवर्ण, अनन्या पाटील 2 रौप्य, द्रीती वेसने 2 कांस्य. 7 ते 9 वयोगट मुले -आर्या कदम 2 सुवर्ण, ऋषिकेश बोर 1 रौप्य 1 कांस्य,
सार्थक चव्हाण 1 रौप्य,
ध्रुव पाटील 1 कांस्य.

7 ते 9 वयोगट मुली -आराध्या पाटील 2 सुवर्ण, प्रांजल पाटील 2 रौप्य, दुर्वा पाटील 2 कांस्य. 9 ते 11 वयोगट मुले सर्वेश पाटील 1 सुवर्ण 1 रौप्य, कुलदीप बिर्जे 1 सुवर्ण 1 रौप्य, शाश्वत विश्वकर्मा 2 कांस्य. 9 ते 11 वयोगट मुली -खुशी आगासमनी 2 सुवर्ण, संचिरा बोर 2 रौप्य, पूर्वी चौधरी 2 कांस्य.Maratha yuvak Sangh

11 ते 14 वयोगट मुले
-सौरभ साळोंखे 2 सुवर्ण, भव्य पाटील 1 कांस्य 1 रौप्य, सत्यम पाटील 1 कांस्य 1 रौप्य. 11 ते 14 वयोगट मुली -जान्हवी तेंडूलकरला 2 सुवर्ण, अनघा जोशी 2 रौप्य, सान्वी इटगीकर 2 कांस्य. 14 ते 17 वयोगट मुले -साईसमर्थ अजना 2 सुवर्ण, तेजस सालोंके 2 रौप्य. स्पीड इनलाइन 5 ते 7 वयोगट मुले -श्रेयांश पांडे 2 सुवर्ण, भाग्यराज पाटील 2 रौप्य, विहान सहकारी 2 कांस्य. 5 ते 7 वयोगट मुली -सिया नगराल 2 सुवर्ण, स्वरा पाटील 2 रौप्य, अमिषा वेर्णेकर 2 कांस्य. 7 ते 9 वयोगट मुले -वरुण सहकारी 2 सुवर्ण, समर्थ मराठे 2 रौप्य, अर्शन माडीवाले 2 कांस्य. 7 ते 9 वयोगट मुली -आराध्या बामंगोल 2 सुवर्ण, मुस्कान शेख 1 रौप्य. 9 ते 11 वयोगट मुले -अवनेश कामण्णावर 1 सुवर्ण 1 रौप्य, विहान कणगली 1 सुवर्ण 1 रौप्य, आर्यन सलोंखे 2 कांस्य. 9 ते 11 वयोगट मुली -अम्या सहकारी 2 सुवर्ण, श्रावणी भिवसे 2 रौप्य, अनवी सोनार 2 कांस्य. 11 ते 14 वयोगट मुले -कृतार्थ आठेल 2 सुवर्ण, अमय ढवळीकर 2 रौप्य, साईराज मेंडके 2 कांस्य. 11 ते 14 वयोगट मुली -सानवी संभ्रंगी 2 सुवर्ण. 14 ते 17 वयोगट मुले -अमेय याळगी 2 सुवर्ण, प्रसन्न वाणी 2 रौप्य. 14 ते 17 वयोगट मुली -करुणा वागेला 2 सुवर्ण.

मराठा युवक संघ आयोजित ही जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, गणेश दादीकर, सागर चोगुले, सोहम हिंडलगेकर, क्लिफ्टन बेरेटो, अजित शिलेदार, वैष्णवी फुलवाले, अनुष्का शंकरगौडा, रोहन कोकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.