Thursday, January 2, 2025

/

तालुका समिती करणार पुन्हा एकदा रिंग रोड विरोधात एल्गार

 belgaum

बेळगाव सह शहर परिसरातील मराठी भाषिकांच्या शेकडो एकर जमिनी संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा मनसुबा प्रशासनाने आखला आहे. रिंग रोडच्या माध्यमातून हजारो एकर सुपीक जमीन बळकावली जाणार असून या विरोधात पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती एल्गार करणार आहे.

तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्‍यांना अधोगतीला नेणारा आहे. शहराच्या चोहो बाजुनी वास्तव्य करणाऱ्या शेतकर्‍यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आह शेतीया जोडधंद्यावर दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. शेतकर्‍यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा लढा उभारून हा शेतकरी विरोधी रिंगरोड प्रकल्प उधळणे काळाची गरज बनली आहे असे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.

कॉलेज रोडवरील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात शनिवार दि. 15 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.आर. के. पाटील यांनी प्रास्तावित केले.

अ‍ॅड. शाम पाटील म्हणाले की, मागे सदर रिंगरोड प्रकल्प कोर्टात याचिका दाखल करून रद्द करण्यात आला होता. पुन्हा सरकारने हा प्रकल्प उभारला आहे तेव्हा आम्ही सर्वजण या शेतकरी विरोधी सुपीक जमिनीवर होणार्‍या प्रकल्पाला पुन्हा तालुक्यातून हद्दपार करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.Mes meeting

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने नेहमी बेळगाव तालुक्यातील अन्यायी जमीन भूसंपादनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. सुपीक जमिनीच्या या भूसंपादना विरोधात तालुका समिती एकवटून एल्गार करेल आणि भूसंपादन जुळून लावेल असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

यावेळी समितीचे चिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील, अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, विलास घाडी, आर. आय. पाटील, मनोहर संताजी, रावजी पाटील, आर. एम. चौगुले, सुभाष मरुचे,  बी डी मोहनगेकर, गुंडू गुंजीकर, परशराम शहापूरकर, मारुती शिंदे, महादेव कंग्राळकर, शिवाजी कुट्रे, आनंद तुडयेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी बैठक

यासंदर्भात सोमवार दिनांक 17 रोजी दुपारी ठीक दोन वाजता संत तुकाराम महाराज सभागृह (ओरिएंटल स्कूल) येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.