बेळगांव महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लावलेल्या ध्वजस्तंभावरील लाला पिवळा झेंडा रात्रीचा फायदा घेत गुपचुपणे बदलण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे असा आरोप केला जात आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू असलेल्या बेळगांव महाणगरपालिकेसमोर कन्नड संघटनांनीपोलीस बंदोबस्तात बळजबरी करत लाला पिवळा ध्वज लावला आहे हा ध्वज लावल्यापासून सातत्याने हा ध्वज काढावा अशी मागणी होऊ लागली आहे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने भव्य मोर्चा काढत ध्वज काढण्याची मागणी लावून धरली होती त्या नंतर प्रशासनाने लाला पिवळा ध्वजाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली होती मात्र अजूनही महापालिकेसमोरील ध्वज काढलेला नसून राज्योउसवा च्या अगोदर महापालिकेसमोर लावलेला ध्वज बदलण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांकडून सुरू होता तसेच चार दिवसापूर्वी कन्नड संघटनाचे कार्यकर्ते महापालिकेसमोर झेंडा बदलण्यासाठी दाखल झाले होते मात्र त्याची माहिती मिळताच पोलिसांनी ध्वज लावण्यापासून कार्यकर्त्यांना रोखले होते मात्र शुक्रवारी अंधाराचा फायदा घेत गुपचुपप पणे ध्वज बदलण्यात आला आहे मात्र ध्वज बदलण्यासाठी पोलिसांचीमिळाली आहे त्यामुळे हे शक्य झाल्याचा देखील आरोप होत आहे.
महापालिकेसमोर लाला पिवळा झेंडा लावण्याचा प्रयत्न सातत्याने कन्नड संघटनाकडून सुरू होता मात्र मराठी भाषिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता महापालिकेच्या जुन्या कार्यलयावर अनेक वर्षे भगवा झेंडा डवलाने फडकत होता मात्र पोलीस प्रशासनाने दादागिरी करत तो झेंडा 2009 मध्ये हटवला होता तसेच सरकारचा आदेश नसताना देखील न्यायालायत केवळ प्रतिज्ञापत्र सादर करून ध्वज हटविण्यात आला होता कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी महापालिकेचे कार्यालय देखील सुभाष नगर येथे हलवले होते मात्र अपवाद वगळता बेळगांव महापालिकेवर नेहमीच मराठी भाषिकांची सत्ता कायम राहिली आहे.