विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण खात्याने माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’ कायद्याची माहिती करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात लैंगिक अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. तसेच अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोक्सोची माहिती देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
त्यामुळे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पोक्सो बाबतची माहिती मिळणार असून त्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण खात्याने केल्या आहेत.
मुलींचे वय 18 पेक्षा कमी असेल आणि तिच्यावर अन्याय झालेला असेल तर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे पोक्सो कायदा काय आहे? आणि त्यातील तरतुदी काय आहेत? याची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणार आहे.
याबरोबरच विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. मात्र विद्यार्थी इतर गोष्टींकडे लक्ष न देता शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष देतील यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त होत आहे.