बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्याना प्रति टन 5500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले.सोमवारी रात्री भरपावसात देखील शेतकऱ्यांनी हे आंदोलन चालूच ठेवले होते.
ऊसाला दर निश्चित करावा यासाठी आक्रमक झालेल्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आणि हसिरू सेनेच्या शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरुद्ध संताप व्यक्त करत आंदोलन केले.
रात्रभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शन केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.एकूणच शेतकरी ऊस बिलासाठी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत.
बेळगाव शहरातील शेतकऱ्यांनी या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे शेतकरी नेते राजू मरवे देखील रात्री उशिरा पर्यंत आंदोलनात सहभागी झाले होते.