बेळगाव सभोवतालील रिंग रोड नंतर आता जमीन संपादन करण्यासाठी बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी शासनाने नवीन नोटिफिकेशन जारी केले असून शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात असे कळवण्यात आले आहे.रिंग रोड नंतर या नवीन रेल्वे मार्गाच्या जमिनी संपादनासाठी हरकती दाखल करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
बेळगाव ते धारवाड या सुमारे 73 कि. मी. अंतराच्या नियोजित रेल्वे मार्गाला ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी पुन्हा एकदा हरकती दाखल करा, असे नोटिफिकेशन कर्नाटक उद्योग विकास महामंडळाने जारी केले आहे.
सदर गॅझेट नोटिफिकेशनची रेल्वे प्रिलिमिनरी नोटीस संबंधित शेतकऱ्यांना दोन दिवसात पोहोचणार आहे तर काहींना पोहीचली आहे. रेल्वे मार्गासाठी आक्षेप नोंदविण्यास 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयासह विशेष भूसंपादन अधिकारी केआयएडीबी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.संबंधित सर्व शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला तर सदर रेल्वे मार्गाच्या कामाला स्थगिती मिळू शकते. याखेरीज उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाला या नोटीस विषयी माहिती देणेही गरजेचे असल्यामुळे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय धारवाड यांच्या वतीने लता अरुण सावंत गर्लगुंजी खानापूर यांना नोटीस देण्यात आली आहे.कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास अधिनियम 1956 च्या कलम 9.28(1) अंतर्गत कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास कायदा 1956 च्या कलम 9.28(1) अन्वये ही मालमत्ता कर्नाटक सरकारद्वारे संपादित केली जात आहे.
धारवाड-कित्तूर-बेळगाव नवीन रेल्वे लाईन 73-00 किमी नवीन रेल्वे मार्गासाठी सदर जमीन संपादन केली जाणार आहे यासाठी 7 ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्य राजपत्राद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली आहे अशी माहिती नोटिशीत नमूद करण्यात आली आहे. धारवाड-कित्तूर-बेळगाव नवीन रेल्वे प्रकल्पासाठी ईएसएच द्वारे उक्त मालमत्ता संपादित करू नये. काही आक्षेप असल्यास, सदर आक्षेप 30 तारखेच्या च्या आत खालील अधिकाऱ्याकडे लेखी पाठवावेत असेही नोटीस मध्ये म्हटलं आहे.