Friday, November 22, 2024

/

खानापुरात धारदार शस्त्राने एकाचा खून

 belgaum

अनैतिक संबंधातून धारदार शस्त्राने एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना खानापूर येथील आश्रय कॉलनी येथे काल रात्री 12 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे आहे.

खून झालेल्या इसमाचे नांव मारुती गणराज जाधव (वय 42) असे आहे. तसेच त्याला ठार करणाऱ्याचे नांव प्रशांत दत्ता नार्वेकर असे आहे. आश्रय कॉलनी, खानापूर येथील आपल्या घरासमोर मारुती हा काल रविवारी रात्री 12 च्या सुमारास जेवण झाल्यानंतर शतपावली करत होता. त्यावेळी प्रशांत नार्वेकर याने अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात प्रसादने प्रथम मारुतीच्या पोटात वार केल्यानंतर पुन्हा मानेवर सपासप वार करून त्याला ठार मारले. खून केल्यानंतर प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मारुतीच्या मृतदेहा शेजारी बसून होता. याबाबतची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रशांतला त्याच्याकडील तलवार व कुऱ्हाडीसह ताब्यात घेतले.

डीवायएसपी कटगी यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुनाचा हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.

गेल्या काही महिन्यापर्वी झालेल्या अरबाज मुल्ला खून प्रकरणा नंतर पुन्हा एकदा मारुती गुरव खून प्रकरणी खानापूर हादरले आहे.शांत असलेल्या खानापूर मध्येही वरचेवर खुनाचे प्रकार घडत आहेत त्यामुळे लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.