1नोव्हेंबर काळ्यादिनाच्या सायकल फेरीत सामील व्हा!1नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना अंमलात आली.पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील तसेच हैद्राबाद संस्थानातील बिदरमधील मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला.
तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो आणि संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करते.मराठी भाषा, लिपी, संस्कृती यांच्या रक्षणाकरिता सर्व मराठी भाषिकांनी मंगळवार दिनांक 1नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या सायकल फेरीत प्रचंड संख्येने
सामिल व्हावे.
आपापल्या विभागातील युवक मंडळे व महिला मंडळे,नागरिक यांनी फेरीतभाग घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत
सायकल फेरीची सुरवात संभाजी उद्यान,महाद्वार रोड बेळगाव येथून सकाळी ठीक 9:00वाजता होईल. फेरीनंतर मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत गांभीर्याने व शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्रएकीकरण समितीच्या वतीने करण्यात येत आहे .
दीपक दळवी अध्यक्ष
मनोहर किणेकर कार्याध्यक्ष
मालोजी अष्टेकर सरचिटणीस
प्रकाश मरगाळे खजिनदार
आणि सर्व पदाधिकारी.