ग्रंथालये खऱ्या अर्थाने मानवाचे आयुष्य घडवितात,वाचन माणसाला अधिक समृद्ध करते.असे विचार प्रा मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले
जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृतीची वाढ व्हावी म्हणून *वाचाल तर वाचाल* यावर प्रा.पाटील यांचे व्याख्यान टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेमध्ये आयोजित केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा चंद्रा चोपडे, संस्थेचे चेअरमन गोविंद फडके,बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक नागेश डोणकरी, सचिव सुलक्षणा शिनोळकर माजी अध्यक्षा निता पाटील उपस्थित होत्या.
शितल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन देशभरात“वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने प्रा. मायाप्पा पाटील सरांचे आज विशेष व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले.
प्रा. पाटील यांनी पुढे बोलताना महामानवांचे चरित्र वाचल्यानंतर आपण त्यांच्यासारखे होण्याची प्रेरणा मिळते.
म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग,मलाला युसुफझई, रघुनाथ माशेलकर यांचे आयुष्य वाचकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. महात्मा फुले, गौतम बुद्ध आपल्याला पुस्तकातच भेटतात. यामुळे वाचन हे खऱ्या अर्थाने परिसाचे काम करते. आजही साने गुरुजी लिखित श्यामची आई’ अनेकांचे जीवन घडवित आहे. तुम्ही कोणत्या जातीत पंथात जन्माला आला, यापेक्षा तुम्ही कोणते पुस्तक वाचत आहात यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर पुनश्च एकदा वाचनालयाचे दरवाजे ठोठावायला हवेत असे सांगितले.
जवळपास तीनशे विद्यार्थिनीना या व्याख्यानाचा लाभ घेता आला.यावेळी जायंट्स सखीच्या उपाध्यक्ष विद्या सरनोबत, अर्चना पाटील, शितल नेसरीकर, ज्योती पवार, राजश्री हसबे,वृषाली मोरे,गौरी गोठिवडेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती अनगोळकर यांनी तर आभार सुलक्षणा शिनोळकर यांनी केले.