*31 ऑक्टोबर ला कोल्हापूर ते बेळगाव अशी निघणार क्रांतीची मशाल रॅली निघणार आहे. एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव कारवार निपाणी हा बहुल मराठी प्रांत कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला.
यामुळे 1956 सालापासून सीमाभागात एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे काळातील म्हणून पाळला जातो आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाकडून क्रांतीची मशाल मिरवणूक निघणार आहे.
ही मिरवणूक 31 ऑक्टोबर ला कोल्हापूर ते बेळगाव निघणार असून कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळापासून मशाल मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी म्हंटले आहे.
ही मिरवणूक कागल मार्गे कोगनोळी निपाणी संकेश्वर हत्तर्गी मार्गे बेळगावला एक नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे यावेळी या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेही सहभागी होणार असल्याचे देवणे यांनी सांगितले आहे.
कोल्हापुरातील शिवसेनेचा काळया दिनाला असाही पाठिंबा pic.twitter.com/wF9PSK7lpd
— Belgaumlive (@belgaumlive) October 28, 2022
दरम्यान देवणे यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांना पत्र पाठवले असून कोल्हापूर ते बेळगांव मशाल रॅली काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांचे समिती अध्यक्ष दीपक दळवी यांना पत्र – काळया बादिनाच्या समर्थनार्थ कोल्हापूर बेळगाव मशाल रॅली pic.twitter.com/0Q4A4tvnDp
— Belgaumlive (@belgaumlive) October 28, 2022