आता तब्बल दहा महिने उलटून गेले तरी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे गेल्या डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळातील हॉटेलची बिलं अद्यापही हॉटेल मालकांना मिळालेली नाहीत आणि ही रक्कम सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते
सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरे यांनी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील वर्षी हे दहा दिवसांचे अधिवेशन बेळगावमध्ये 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाची बिले अद्यापपर्यंत हॉटेल मालकांना मिळालेली नाहीत. त्यावेळी अधिवेशन समाप्त होतात 30 दिवसाच्या आत सर्व बिले अदा केली जातील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बिलाची अर्धी रक्कम तीही काही मोजक्याच हॉटेल चालकांना अदा करण्यात आली आहे. मागील 2021 च्या अधिवेशनासाठी 2018 सालच्या प्रचलित दरानुसारच बिलाची रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आजतागायत बिले आता करण्यात आलेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आता मागील हिवाळी अधिवेशन संपून 10 महिन्याहून अधिक कालावधी झाला असला तरी एकूण सुमारे 2 कोटी रुपयांची हॉटेल बिले देण्यात आलेली नाहीत. अधिवेशन सुरू झाल्यानंतर हॉटेल्सच्या बजेट बाबत विचारणा केली असतात त्यांनी ते मंजूर झाले असल्याचे सांगितले होते.
परंतु बिलाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही अधिवेशनाच्या एकंदर खर्चामध्ये हॉटेल बिलांचाही समावेश असला तरी ती वेळेवर अदा केली जात नसल्याचा प्रकार दरवर्षी घडत आहे.