उद्घाटनाच्या दिवशी इंडिगोचा बेंगळुरू-बेळगाव या अतिरिक्त फ्लाइटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदर विमान ८१% भरले होते.
इंडिगो या खाजगी विमान कंपनीने रविवारी (ऑक्टो. 30रोजी) बेंगळुरू-बेळगाव-बेंगळुरू सेक्टरमध्ये अतिरिक्त नियमित उड्डाण सुरू केली आहे.
रविवारी नियमित उड्डाणाच्या उद्घाटनादरम्यान, 63 प्रवासी बंगळुरु हून बेळगावला येथे आले तर 61 प्रवाशांनी बेळगाव हून बंगळुरू कडे (78 आसनी विमान) उड्डाण केले. 6E-7285 या इंडिगो विमानाचे बेळगाव विमानतळावर वॉटर कॅनन सलामी देऊन स्वागत करण्यात आले.बेळगाव बंगळुरु दरम्यान दररोज हजारो प्रवाशांची ये जा असते त्यामुळं या रुट वर विमानसेवा वाढवण्याची मागणी जुनी आहे.दरम्यान सदर विमान सेवा कायमस्वरूपी सुरू रहावी अशी मागणी या दरम्यान वाढू लागली आहे.
इंडिगो एअरलाईनतर्फे बेळगाव विमान तळावर दीप प्रज्वलन आणि केक कटिंगचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बेळगावच्या खासदार मंगल सुरेश अंगडी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, आमदार अनिल बेनके,विमान तळाचे संचालक राजेश कुमार मौर्य, श्रीमती रोझिना यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि केक कटिंग कार्यक्रम पार पडला.विमानतळ व्यवस्थापक-इंडिगो एअरलाइन, इतर भारतीय विमान उड्डाण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव हून बंगळूरूसाठी दररोज दोन विमान सेवा उपलब्ध असणार आहे.सकाळचे विमान बेंगळुरूहून 9.30 वाजता निघते आणि 10.55 वाजता बेळगावला पोहोचते आणि बेळगाव हून बेंगळुरूकडे (BLR) 11.15 वाजता प्रस्थान करते.
दुसरी फ्लाइट संध्याकाळी उशिरा निर्धारित, 19:10 वाजता बेळगावला आगमन आणि 19.30 वाजता बंगळुरू कडे प्रस्थान करते.