Monday, January 6, 2025

/

जायंट्स मेनने केली सीमोल्लंघन मैदानाची स्वच्छता*

 belgaum

विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनासाठी बेळगाव शहरातील पालख्या कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर येत असतात. बेळगावकरांच्या वतीने या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव भगिनी आणि बालगोपाल सहभागी होत असतात.
यावेळी अनेक खाद्यपदार्थाच्या गाड्या, स्टॉल्स त्याठिकाणी असतात. पण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर रद्दीपेपर, प्लेट्स, चमचे, ग्लास इतर साहित्य मैदानावरच फेकले जातात. गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याची उचल दुसऱ्या दिवशी सकाळी जायंट्स मेनच्या माध्यमातून केली जाते. यावर्षीही ग्रूपच्या सदस्यानी विद्या निकेतन मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली असे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून जायंट्सने स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना आवाहन करून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण स्वच्छता आणि प्लास्टिक वापराच्या बाबतीत अजूनही म्हणावी तशी जागरुकता लोकांत झालेली नसल्याबद्दल फेडरेशन संचालक मदन बामणे यांनी नाराजी व्यक्त केली.

स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर यांनीही जनतेला पुन्हा एकदा स्वच्छता राखण्याबद्दल आवाहन केले आणि राष्ट्रसेवादलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
पहाटेपासून जायंट्सचे माजी अध्यक्ष संजय पाटील, सुनिल भोसले, विकास कलघटगी,अशोक हलगेकर,सेक्रेटरी मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर,अविनाश पाटील,सुनिल चौगुले,दिगंबर किल्लेकर,विजय बनसुर,अजित कोकणे,महेश शहापूरकर,आनंद कुलकर्णी,महादेव भस्मे,प्रकाश तांजी,विनोद आंबेवाडीकर,पद्मप्रसाद हुली,नारायण किटवाडकर यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. Clenness

*यावर्षी राष्ट्रसेवादलाच्या शिबिरार्थींचे विशेष सहकार्य*

दरवर्षी केल्या जाणाऱ्या या सीमोल्लंघन मैदान स्वच्छता मोहिमेत यावर्षी राष्ट्रसेवादलाचे विशेष सहकार्य लाभले.
येथील मराठी विज्ञानिकेतन शाळेत गेले आठवडाभर राष्ट्रसेवादलाचे शिबीर सुरू असून या शिबिरार्थींनी सुद्धा या मोहिमेत भाग घेऊन जायंट्सच्या स्वच्छता चळवळीला सहकार्य केले.

राष्ट्रसेवादलाच्या देशासाठी एक तास या चळवळीतुन हे कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल सेवादलाचे प्रमुख बाबासाहेब आणि मगदूम सरांनी जायंट्सचे आभार मानले.
या स्वच्छता मोहीमेत मुख्याध्यापक नारायण उडकेकर,निलुताई आपटे,जी व्ही सावंत विभागप्रमुख सीमा कंग्राळकर,भारती शिराळे, लता पाटील, मुक्ता कलखांबकर, मंजुषा पाटील,दत्ता पाटील, बी के पाटील आणि नारायण गणाचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.