वसंत कुलकर्णी यांचे मरणोत्तर नेत्रदान-त्वचादान
*जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार*- फुलबाग गल्ली येथील रहिवासी वसंत कुलकर्णी यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले निधनसमयी ते ६८ वर्षाचे होते.त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी कुलकर्णी कुटुंबीयांना नेत्रदान त्वचादानाविषयी माहिती दिली.
त्यांच्या होकारानंतर केएलई नेत्रपेढीच्या डॉ.मुस्कान गाबा आणि डॉ.प्रदोष यांनी नेत्रदानाची तर केएलई-रोटरी स्किन बँकेच्या डॉ.आदित्य,अश्विनी इंगळे व इतर सहकाऱ्यांनी त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण केली.
मदन बामणे यांनी कुलकर्णी कुटुंबीयांचे आभार मानले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चव्हाण हेही उपस्थित होते.
*उर्मिला शिवाजीराव भोसले यांचे मरणोत्तर नेत्रदान*
बेळगाव:शास्त्रीनगर येथील रहिवासी उर्मिला शिवाजीराव भोसले यांचे काल वार्धक्याने निधन झाले. निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी भोसले कुटुंबियांना नेत्रदानाविषयी माहिती दिली.लागलीच या सामाजिक सेवेला त्यांनी होकार दर्शविला.
मदन बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला. नेत्रपेढीच्या डॉ.कीर्ती आणि डॉ मोना यांनी मध्यरात्री नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.यावेळी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे आणि अध्यक्ष शिवराज पाटील उपस्थित होते.