शेताला भात पिकाची पाहणी करायला गेलेल्या महिलेचा विद्युत भारित सर्विस तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील शगनमट्टी येथील शेतवाडीत घडली आहे.
चांगुना कृष्णा मंडोळकर वय 58 वर्षे राहणार बस्तवाड हलगा बेळगाव असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की चांगुना यांचे शगनमट्टी जवळील शिवारात शेत आहे शनिवारी सकाळी त्या शेतीतील भात पिकांची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी शेतातील विद्युत भारीत सर्विस तार तुटून खाली पडली होती त्या विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
आजूबाजूच्या शेतवाडीतील लोकांनी सदर घटनेची माहिती चांगुणा यांच्या नातलगांना दिली हिरेबागेवाडी पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे.
शेतात काम करायला गेलेल्या महिलेचा शॉक लागून दुर्दैवी अंत: झाल्याने शेत वाडीतील विद्युत भारित तारा दुरुस्त करण्याच्या मागणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर घटनेत मृत्यमुखी शेतकरी महिलेला नुकसान परभणी द्यावी अशी मागणी या निमित्ताने वाढू लागलेली आहे