बेळगाव ग्रामीण भागातील एका तरुणाला व्हाट्स अँप द्वारे बनावट मुद्रा लोनच्या जाळ्यात ओढण्यात आले . सदर तरुणाला मुद्रा लोन चे आमिष देऊन त्याच्या कडून तीस हजार रुपये उकळण्यात आले आहे.
अनेकदा सायबर पोलिसांकडून जनजागृती केली जात असताना नवं नवीन शक्कल काढून ऑनलाइन फसवणुकीत वाढ होत आहे.मागील आठवड्यात बेळगाव पोलिसांनी कोणतेही अनोळखी लिंक ओपन करू नका सावधानता बाळगा असे आवाहन केले होते. जनतेने याबाबतीत सतर्क रहाण्याची गरज आहे.
मुद्रा लोनचे डुप्लिकेट वेबसाईट तयार करून फसवण्यात आलेला हा प्रकार एखाद्या सराईत सायबर गुन्हेगाराचे असू शकतो कारण तरुणाला ज्या संकेत स्थळावर पैसे पाठवण्यास सांगितले गेले त्या वेब पेज चे नाव व रचना हुबेहूब मुद्रा लोनच्या सरकारी वेब पेज प्रमाणे बनवली होती.
सायबर गुन्हेगाराकडून आधुनिक तंत्रज्ञान व सामान्य जनतेच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत.
नागरिकांना कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येतो. ही माहिती इतरांना सोबत शेर करून ऑनलाईन गुन्हेगारा विरुध्द या लढाईत सहभागी व्हा.
रवी बेळगुंदकर
संचालक ऐम कोचिंग इन्स्टिट्यूट
बेळगाव.