वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावतर्फे आयोजित धावणे, सायकलिंग आणि पुन्हा धावणे अशा स्वरूपाची ड्युएथलॉन शर्यत नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावतर्फे स्टॅंडर्ड (10 कि.मी. धावणे, 40 कि.मी. सायकलिंग व 5 कि.मी. धावणे) आणि स्प्रिंट (5 कि.मी. धावणे, 20 कि.मी. सायकलिंग व 2.5 कि.मी. धावणे) अशा दोन विभागात ही ड्युएथलॉन शर्यत घेण्यात आली.
शहरात आयोजित केलेल्या ड्युएथलॉन शर्यतीच्या या दुसऱ्या आवृत्तीमध्ये शहर परिसरातील सुमारे 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धकांना त्यांच्या टायमिंगसाठी म्हणजे वेळेची नोंद ठेवण्यासाठी टाईम चिप्स देण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धकांमध्ये वय वर्ष 17 पासून 74 वर्षे वयापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. ड्युएथलॉन या क्रीडा प्रकारामध्ये एकाहून अधिक क्रीडा प्रकारांचा (मल्टीस्पोर्टस) समावेश असतो. ट्रायथलॉन सारखाच हा क्रीडा प्रकार असला तरी यामध्ये तीन ऐवजी फक्त दोनच क्रीडा प्रकार असतात. ट्रायथलॉनमध्ये पोहणे, सायकलिंग व धावणे हे क्रीडा प्रकार, तर ड्युएथलॉनमध्ये धावणे, सायकलिंग व धावणे हे क्रीडा प्रकार असतात.
वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ड्युएथलॉन शर्यतीतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत. ऑलम्पिक पुरुष (वय 14 ते 40) : सोनान्यू वाल्मीकी, ऋतुराज, संतोष शिंदे. (41 वरील वयोगट) महांतेश, राहुल पोरवाल, सदानंद कुमार, अजय नायर. ऑलम्पिक महिला : 14 ते 40 वयोगट -श्रुती पाटील, श्रेया सुंठणकर. 41 वरील वयोगट -मयुरा शिवलकर, वैशाली जाधव. स्प्रिंट पुरुष : 41 वरील वयोगट -सुरेंद्र पाच्छापूरकर, समीर वेर्णेकर, ज्योतिबा हुंदरे. 14 ते 40
वयोगट – आशिष होनमने, गुरुराज हेगडे, कृष्णा. स्प्रिंट महिला : 41 वरील वयोगट -सुषमा भट, सारिका नाईक, सोनाली एच. 14 ते 40 वयोगट -नुपूर वाटवे, नंदा अष्टेकर, डॉ रेश्मा कामटे.
ऑलम्पिक संघ : शेखर काळे व सोमशंकर गिराम, बाळाप्पा कुगजी व रणजीत कणबरकर, दीपक बोराडे व सुरेश चौगुले. स्प्रिंट संघ : प्रदेव गरुड व श्रीकांत बी., सुशांत बोराडे व भावकू जाधव संतोष पाटील व आर्यन पाटील.