सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे.विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते.प्रा. आनंद मेणसे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना सातेरी यांनी गेल्या पन्नास वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
या नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या व आपल्याला संघटनांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सत्कार समारंभासाठी पुढीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात आली.
अध्यक्ष आनंद मेणसे, उपाध्यक्ष प्रकाश मरगाळे, विलास अध्यापक, सी. एस. बिदनाळ, संजय सातेरी, कार्यवाह कृष्णा शहापूरकर, सहकार्यवाह ऍड. सुधीर चव्हाण, गोपाळ शहापूरकर, लता पावसे, अशोक आलगोंडी, खजिनदार अनिल आजगावकर, सदस्य ऍड. सतीश बांदिवडेकर, चंद्रकांत मजकूर, सदानंद सामंत, अमर येळ्ळूरकर, शेखर पाटील, मधु पाटील, जी. व्ही. कुलकर्णी, आनंद कानविंदे, दिगंबर पवार, गायत्री गोणबरे,
प्रा. दत्ता नाडगौडा, सतीश पाटील, अशोकभाई देशपांडे, ऍड. महेश बिर्जे, सुहास हुद्दार, अनंत जाधव, मोहन कारेकर, ऍड. सुरेश तरळे, ऍड. अशोक पोतदार, ऍड. शंकर पाटील, अर्जुन सांगावकर, यल्लूबाई शिगीहळ्ळी.गिरीश काँप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या बैठकीस बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.