दिवाळी सणानिमित्त घराकडे परतण्यासाठी लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वायव्य परिवहन महामंडळाने येत्या 22 ते 30 ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली असून यासाठी सुमारे 500 बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दिवाळीनिमित्त वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव, चिक्कोडी, गदग, धारवाड, हुबळी, कारवार, हावेरी व बागलकोट विभागातून सुमारे 500 अतिरिक्त बसेस येत्या 22 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत राज्य आणि आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत.
येत्या 22 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार, 23 ऑक्टोबरला रविवार, 24 रोजी नरक चतुर्दशी आणि 26 रोजी दीपावली पाडवा असल्याने या दिवशी बेंगलोर, मंगळूर, हैदराबाद, पणजी, मुंबई, पुणे या प्रमुख मार्गावर अतिरिक्त बस सेवा उपलब्ध असणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी म्हणून 26 ते 30 ऑक्टोबरपर्यंत ही बस सेवा सुरू राहणार आहे. बससाठी आगाऊ आरक्षणही करता येणार असून www.ksrtc.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण केले जाऊ शकते. तेंव्हा प्रवाशांनी या अतिरिक्त बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंडळाने केले आहे.