Saturday, December 21, 2024

/

गोसावी मठाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

 belgaum

दसऱ्यानिमित्त बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी मठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदिच्छा भेटीप्रसंगी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मराठा समाज हा कधीही पराभव स्वीकारणारा समाज नाही.

मराठा समाज म्हणजे राष्ट्ररक्षणात सदैव पुढे राहणारा समाज. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती शुल्कात वाढ करण्याच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे सांगून मराठा समाजाने समाजकरण आणि राजकरणात पुढे आले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री बोम्मई यांनी व्यक्त केले.Kiran jadhav

मराठा समाजाचे युवा नेते आणि भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त करताना मराठा समाजाच्या विकासासाठी व समृद्धीसाठी राज्य शासनाने मराठा निगम मंडळाची स्थापना करून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. अनुदानाची तरतूद करण्यात आली ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले.

याप्रसंगी गोसावी मठाचे मठाधीश व मराठा समाजाचे स्वामीजी श्री मंजुनाथ स्वामीजी, मराठा महामंडळ मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मूळे, सकल मराठा समाजाचे बेळगाव संघटक व भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, गणेश केसरकर, रोहित साठे, मनोज शिंदे आदिंसह मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.