ईद ए मिलाद सणाच्या उत्साहात आपल्या मित्रांसमवेत खेळत असणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अनगोळ येथे घडली आहे.
राजहंस गल्ली येथे ही घटना घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.सादिद मुजम्मिल मुल्ला (वय ११) असे मयत बालकाचे नाव आहे.
तो मूळचा एम के हुबळी गावचा रहिवासी असून तो बेळगाव येथे आपल्या आत्याकडे आला होता, त्यावेळी ही घटना घडली आहे.
त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी ही घटना सांगताच त्याला बाहेर काढून उपचार करण्याचा प्रयत्न झाला मात्र उपयोग होऊ शकला नाही.