शाळांना सुट्टी असल्याने पतंग उडवताना टेरेसवरून खाली पडल्याने एका अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अरमान दफेदार (11) रा. तिरंगा कॉलनी, उज्वल नगर बेळगाव असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
अरमान हा घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना घसरून खाली पडला गंभीर जखमी झाला नंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
कालच बुधवारी अरमान दफेदार आपल्या कुटुंबासह अशोक नगर येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी आला होता आणि आज सकाळी नाश्ता करून मोठ्या भावासोबत पतंग उडवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेला होता तो टेरेसवरून घसरला आणि खाली पडला त्यात गंभीर जखमी झाला होता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
शाळांना सुट्टी असल्याने लहान मुले खेळात दंग असतात सध्या बेळगावात पतंग उडविण्याचा मोसम आहे.पतंग उडवतेवेळी पालकांनी देखील आपल्या मुलांची योग्य खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.