भाषावार प्रांतरचनेत केंद्र सरकारने मराठीबहुल बेळगावसह सीमाभागातील 865 खेडी कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर (मंळवारी) काळादिन पाळण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरी निघणार असून दुपारी 12 वाजता मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार असून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील हेसुद्धा सहभागी होणार आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्यात येतो. सकाळी मूक सायकल फेरी आणि त्यानंतर जाहीर सभा होत असते. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ही फेरी निघाली नाही. समितीने जाहीर सभा घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा कायम ठेवला. यंदा कोरोना महामारी नसल्यामुळे आणि सर्व निर्बंध हटल्यामुळे काळ्यादिनाच्या फेरीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होण्याचा अंदाज आहे. भाषावार प्रांतरचनेत केंद्र सरकारने मराठीबहुल बेळगावसह सीमाभागातील 865 खेडी कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर (मंळवारी) काळादिन पाळण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरी निघणार असून दुपारी 12 वाजता मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार असून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील हेसुद्धा सहभागी होणार आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्यात येतो. सकाळी मूक सायकल फेरी आणि त्यानंतर जाहीर सभा होत असते. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ही फेरी निघाली नाही. समितीने जाहीर सभा घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा कायम ठेवला. यंदा कोरोना महामारी नसल्यामुळे आणि सर्व निर्बंध हटल्यामुळे काळ्यादिनाच्या फेरीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 23 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांची अस्मिता आणि ताकद दाखवण्यासाठी मंगळवारी होणार्या काळ्यादिनाच्या फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गावोगावी जनजागृती बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला असून मंगळवारी विराट फेरी निघण्याची शक्यता आहे.
या काळ्यादिनाला महाराष्ट्र सरकारने आपला प्रतिनिधी पाठवावा, असे आवाहन म. ए. समितीने केले होते. त्यानुसार समिती पदाधिकारी प्रकाश मरगाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानुसार राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर किंवा खासदार धैर्यशील माने महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी व्हायची शक्यता आहे.
निषेध फेरीचा मार्ग असा
मंगळवारी (दि. 1) सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून फेरीला प्रारंभ होणार आहे. फेरी महाव्दार रोड, तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, हेमू कलानी चौक, अंबा भुवन, शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, बसवाण गल्ली होसूर, नार्वेकर गल्ली शहापूर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरु चौक, गणेपूर गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस खानापूर रोड ते मराठा मंदिर पर्यंत निघणार आहे. दुपारी 12 वाजता जाहीर सभा होणार आहे.