गोकाकचे आमदार आणि माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांना पक्षात लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मत राज्य भाजप प्रभारी अरुण सिंह यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या दौऱ्यावर असलेले अरुण सिंह रविवारी रात्री बेळगावात दाखल झाले होते त्यांनी शासकीय विश्रामगृहात भाजप नेत्यांशी बैठक केली त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.
अरुण सिंह यांच्या वक्तव्या नंतर रमेश जारकीहोळी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अरुण सिंह सोमवारी चिकोडी भाजप नेत्यासोबत बैठक करणार आहेत.
बेळगाव जिल्हा भाजपात कसलेच मतभेद नाहीत, जे काही मतभेद आहेत ते काँग्रेसमध्येच आहेत असा दावा करत त्यांनी अरुणसिंह म्हणाले, येडियुरप्पा हे भाजपचे कर्नाटकातील प्रभावी नेते आहेत.
आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत. त्यांचे प्रयत्न तसेच लोकांचा कल यामुळे 2023च्या निवडणुकीत भाजप 150 जागांवर सहज विजय प्राप्त करेल.