Thursday, December 26, 2024

/

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य महिला पतसंस्था : श्रीभक्ती महिला सहकारी पतसंस्था

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : आकाश आणि पाताळ यांच्यातील प्रत्येक दुवा असणाऱ्या क्षेत्रात आज महिला ठामपणे पाऊल रोवून उभ्या आहेत. त्याग, नम्रता, क्षमा, दया, माया आणि सुजाणपण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्री! प्रत्येक क्षेत्रात आज महिला कर्तृत्व गाजवत आहेत. पोलीस, लष्करी दल याचबरोबर रिक्षा, ट्रक, पेट्रोलपंप, बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, शिक्षिका, वैमानिका, पत्रकारिता, फायरब्रिगेड यासारखी असंख्य क्षेत्रे आज महिलांनी काबीज केली आहेत. याचप्रमाणे सहकार क्षेत्र हेदेखील महिलांच्या मक्तेदारीत येत आहे. बेळगावमधील सहकार क्षेत्रातदेखील महिला मोलाची कामगिरी बजावत असून बेळगावमधील “श्री भक्ती महिला सहकारी पतसंस्थेच्या” माध्यमातून महिलांनी महिलांसाठी चालविलेली एक पतसंस्था नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे.

रौप्य्महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेने सहकार्य क्षेत्रात आपला विशिष्ट असा ठसा उमटविला आहे. बेळगावच्या सहकार क्षेत्रात या पतसंस्थेचे कार्य आणि या पतसंस्थेत कार्यरत असणाऱ्या संचालिकांचे कार्य उल्लेखनीय आहे. गेल्या २३ वर्षात या संस्थेने सातत्याने आपल्या प्रगतीचा आलेख नेहमी चढत्या क्रमात ठेवला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षअखेर या संस्थेत ६,७०९ सभासद आहेत तर १,७०,३४,३०० रु. इतके भागभांडवल आहे. ५,५३,५१,९१५ रुपये एकूण निधी तर ग्राहकांची विश्वासार्हता जपत या संस्थेकडे २९,२९,१२,४६० रुपयांच्या ठेवी आहेत. समाजातील आर्थिक नड असलेल्या ग्राहकांना या संस्थेच्या माध्यमातून १६,१५,१६,८८५ रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ३६,७८,१२,४६१ रुपये इतके खेळते भांडवल तर २१,५३,७०,९७५ रुपयांची गुंतवणूक संस्थेने केली आहे. यंदा संस्थेने २५,१३,७८६ रुपयांचा नफा मिळविला असून सभासदांना ९ टक्के लाभांशही जाहीर केला आहे.

‘श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ने केवळ आपले कार्यक्षेत्र शहरापुरते मर्यादित ठेवले नसून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत रामलिंग खिंड गल्ली येथील मुख्य शाखेसह विजयनगर आणि शहापूर येथेही शाखा सुरु केल्या आहेत. या संस्थेची स्थापना मनोहर देसाई यांनी केली असून चेअरपर्सनपदी ज्योती अगरवाल, व्हाईस चेअरपर्सनपदी रुपाली जनाज या कार्यरत आहेत. तर संचालिका मंडळात वंदना चव्हाण, शोभा किल्लेकर, कल्पना देसाई, भक्ती देसाई, श्वेता देसाई, ज्योती पाटील यांचा समावेश आहे. अतुल कुलकर्णी हे मुख्य शाखेच्या मॅनेजरपदी तर शाखा मॅनेजर म्हणून सागर पाटील, अरुण रेवणकर हे कार्यरत आहेत तर सुनील पाटील हे रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम पाहात आहेत.Bhakti mahila

अनेक क्षेत्रात आज महिलांनी जरी उत्तुंग यश कमविले असले तरी मागील काही कालावधीत सर्वसामान्य महिला या प्रवाहापासून दूरच होत्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सहकार चळवळीमुळे साध्य झाले असून श्रीभक्ती महिला सहकारी पतसंस्थेप्रमाणे अनेक महिला संस्थांच्या माध्यमातून महिला कार्यरत आहेत. बेळगावमधील महिला सहकारी पतसंस्थांमधील श्री भक्ती महिला सहकारी पतसंस्था हि एक अग्रगण्य आणि प्रमुख महिला सहकारी संस्था असून महिलांचा समाजातील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अशा पतसंस्था मोलाचे योगदान देत आहेत.

आर्थिक स्वावलंबन हि महत्वाची गोष्ट सहकार चळवळीच्या माध्यमातून अधोरेखित होत असून महिलांचे सामर्थ्य पूर्णपणे ओळखून त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास महिला सहकार क्षेत्रात अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकतात. सहकार क्षेत्रामुळे आज अनेक महिला एकत्रित येत असून एकमेकींना सामावून घेत अडीअडचणीच्या काळात एकमेकींना होत असलेल्या मदतीमुळे महिलांची वाट सुकर होते आहे, हे नक्की. यासाठी भक्ती महिला सहकारी पतसंस्थेसारख्या संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.