ईद-ए-मिलाद सणानिमित्त उद्या रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये मद्य (दारू) विक्रीवर बंदी असणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा बंदी आदेश जारी केला आहे.
मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण उद्या रविवारी साजरा केला जाणार आहे. हा सण शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उद्या बेळगाव शहर आणि तालुक्यातील दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने दारूची दुकाने, बार आणि दारू विक्री करणारे बार -रेस्टॉरंट उद्या रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच अबकारी आयुक्त बेळगाव तालुका, बेळगाव शहर पोलीस आयुक्त (कायदा -सुव्यवस्था) आणि संबंधित अधिकारी, याखेरीज अबकारी अधीक्षक आणि अबकारी उपाधीक्षक बेळगाव यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी,
असे जिल्हा दंडाधिकारी आणि बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या आदेशात नमूद आहे.