Sunday, September 8, 2024

/

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून कार्यशाळा

 belgaum

बेळगाव जिल्हा मराठा सेवा संघ आणि कोतेकर ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी आणि उद्या गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी बेळगाव भागातील एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या सीमाभागातील मराठी भाषिक इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या वार्षिक परीक्षेला कसे सामोरे जावे? आत्मविश्वास कसा वाढवावा? सकारात्मक विचार कसे करावे? इत्यादी विद्यार्थी संबंधित विषयावर मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. मराठा सेवा संघाच्या गेल्या 9 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमात विठ्ठल कोतेकर यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामुळे अनेकांना नवी संजीवनी मिळाली होती.

आपल्या सर्व ज्ञानाचा सीमाभागातील विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी कोतेकर ह्यूमन डेव्हलपमेंट फौंडेशनचे विवेक कोतेकर हे आज 21 व उद्या 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी केले आहे. कार्यशाळांची कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे आहे.

बुधवार दि. 21 सप्टेंबर : सकाळी 10:00 ते 11:00 होनगा हायसकूल, होनगा. दुपारी 11:30 ते 12:30 कडोली हायस्कूल, कडोली. दुपारी 1:00 ते 2:00 केदनूर हायस्कूल, केदनूर. 3:30 ते 4:30 हंदिगनूर हायस्कुल, हंदीगनूर.

गुरुवार दि. 22सप्टेंबर : सकाळी 9:30ते 11:30 शंकर पार्वती मंगल कार्यालय आम्बराई, उचगाव. मळेकरणी, चिरमुरी व बेकिनकेरे हायस्कूलसाठी. दुपारी 12 ते 1:30 सुवर्ण हॉल एसव्हीएचएस – एसव्हीएचएस व अतीवाड हायस्कूल. दुपारी 1.:30 ते 2 भोजन सुट्टी. दुपारी 2:30 ते 3:30 गोजगे हायस्कूल -गोजगे,

गोजगे, मन्नूर, आंबेवाडी विद्यार्थ्यांसाठी. सायंकाळी 4 ते 5 हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा. वरील सर्व कार्यशाळांचे शिस्तबद्ध नियोजन शरद पाटील, मणगुत्ती (माजी विद्यार्थी एसव्हीएचएस, 9632716497) यांनी केले आहे. त्यांना विठ्ठल कोतेकर (9921111665) आणि ॲड. सुधीर चव्हाण, बेळगांव (9448691867) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.