डीएड,बीएड धारकांची संख्या वाढत असताना, अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी आणि सीईटी प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने पात्र उमेदवारांना टीईटी परीक्षेची प्रतीक्षा आहे.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज सीईटी परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांना टीईटीची प्रतीक्षा होती. सदर प्रतीक्षा संपली असून शिक्षण विभागाने आता टीईटी होणारं आहे.
नुकताच सार्वजनिक शिक्षण खात्याने गुरुवारी 2022 सालातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घेण्याकरता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविले आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी महिनाभर मुदत देण्यात आली आहे.
शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी यासंबंधीचा आदेश बजावला असून सीईटी साठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्या सूचना शुल्क व इतर माहिती जाणून घेऊन अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.