सरकारी प्राथमिक मराठी शाळा नं.३६, टिळकवाडी बेळगांव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील यांना जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक शिक्षिका म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असे आहे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी तसेच समाज प्रेमी दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून शाळेचा कायापालट करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
नुकताच 2019 सालामध्ये शाळेचा शतक महोत्सव अगदी उत्साहात पार पडला असून त्यांच्या प्रयत्नातूनच शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. इनरव्हिल क्लब बेळगाव यांच्या सहकार्याने मूलभूत सुविधा व हॅप्पी स्कूल या संकल्पना त्यांनी साकार करून घेतल्या आहेत.
शिक्षण खात्याच्या विविध मार्गदर्शन शिबिरात त्यांचा सहभाग असतो., प्रार्थना गायन, अहवाल लेखन-वाचन या सदरातून सर्व माध्यमाच्या शिक्षक-शिक्षिकांनशी सलोखा ठेवला आहे. याशिवाय शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यानुसार मार्गदर्शन करणे यामुळे पालक वर्ग देखील त्यांना परिचित आहे.
त्या २२ वर्षे प्रामाणिक, अविरत सेवा करत असून लहाणग्याना आईप्रमाणे मांडीवर घेऊन शिकवनं, गाणी शिकवणं यामुळे विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका आहेत.म्हणूनच अशा चौफेर व्यक्तिमत्व असणाऱ्या विद्या पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
२०२२-२३ सालचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, बिडी. येथील प्रा. श्री एल.पी.पाटील यांना जाहीर झाला आहे. खानापूर तालुक्यातील किरहलशी येथील सामान्य कुटुंबात जन्म झाला असून बिडी येथिल एन.एम.माध्यमिक शाळेत सहशिक्षक म्हणुन गेली २२ वर्षे ते कार्यरत आहेत.
शिक्षणप्रेमी, विद्यार्थीप्रिय, सक्रियशिक्षक म्हणुन परिचित असून परिसरातील अनेक खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहोचून शिक्षणाचे महत्त्व पर्याय, मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या हातून आज अनेक विद्यार्थी उच्च पदस्त, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उद्योजक, पत्रकार म्हणून सरांचा वारसा अविरत चालवत आहेत.
शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्याशी अगदी आदराने वागणारी व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक आहे.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गेली २० वर्षे अविरत प्रयत्न करत असून प्रत्येक कार्यात उत्कृष्ट सहभाग तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग आहे.शिवाय इंग्रजीसह मराठी, कानडी व हिंदी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे.
कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा सहशिक्षक संघात, बेळगांव जिल्हा पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. खानापूर तालुका माध्यमिक शाळा नोकर सहकारी सोसायटीचे सक्रिय संचालक म्हणून सेवा केली. सरांच्या चौफेर कामगिरीचा, अनुभवचा विचार करून ग्रूप एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळाने त्यांना पी.यू. काॅलेजवर प्राचार्य म्हणून सूत्रे हाती दिली.
तेथेही त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन इयत्ता बारावीचा कला विभाग ८२% तर वाणिज्य विभाग १००% निकाल लावून एक वेगळा इतिहास घडवला. आज बिडी परिसरातील एक उत्तम महाविद्यालय म्हणून काॅलेजकडे आदरांने पाहिले जाते.एकूणच त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन शिक्षण खात्याच्यावतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.