विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत मदतीसाठी धावून येणाऱ्या विद्या आधार या संस्थेच्या माध्यमातून आज भरतेश हायस्कूल मध्ये शांताई विद्या आधारच्या वतीने दहा विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी जवळपास ८० हजार रुपये देण्यात आले.
पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, भरतेश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. राजीव दोड्डान्नावर, विजय मोरे, पर्यावरण विकास अधिकारी एच. जगदीश, विद्या आधार संस्थेचे संतोष ममदापुर, अलन मोरे, श्रीपाद खेमलापूर, राजेश रामगोंड, योगिता पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत केले तर मुख्याध्यापिकांनी स्वागत केले.
विजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या ८ वर्षांपासून विद्या आधारच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु असून ४० लाख रुपयांच्या रद्दीची विक्री करून शांताई विद्या आधारच्या वतीने ४५० विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे. समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या, अडीअडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी जनतेने रद्दी देऊन या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एच जगदीश यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकबाबत जनजागृतीपर विचार व्यक्त करत शांताई विद्या आधार संस्थेला शुभेच्छा दिल्या. पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी विजय मोरे यांनी कोविडकाळात बजाविलेल्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी भरतेश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. राजीव दोड्डाण्णावर, विजय मोरे, पर्यावरण विकास अधिकारी एच. जगदीश, विद्या आधार संस्थेचे संतोष ममदापुर, अलन मोरे, श्रीपाद खेमलापूर, राजेश रामगोंड, योगिता पाटील यासं अनेक मान्यवर उपस्थित होते. संतोष ममदापुर यांनी आभार मानले.