सरकारी गोदामातील रेशन भरून घेण्यासाठी बेनकनहळ्ळी – बेळगुंदी रस्त्यावर एका बाजूला रांगेने थांबलेल्या ट्रक व लॉऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून ग्रामीण पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बेनकनहळ्ळी – बेळगुंदी मार्गावर बेनकनहळ्ळी येथे सरकारी रेशन गोदाम आहे. या गोदामातून रेशन घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने ट्रक व लॉऱ्या या ठिकाणी येत असतात. सदर मालवाहू वाहनांना पार्किंगसाठी मोकळी खुली जागा नसल्यामुळे ती रस्त्याकडेलाच पार्क केली जातात.
परिणामी अवजड वाहनांची मोठी रांग लागून सदर मार्गावरीलवाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेष करून बेनकनहळ्ळी व बेळगुंदी भागातील वाहन चालकांची रस्त्याकडेला थांबलेल्या अवजड वाहनांमुळे मोठी गैरसोय होत आहे.
ट्रक व लॉऱ्यांमुळे अर्धा रस्ता व्यापला जात असल्याने उर्वरित अरुंद मार्गावरून ये -जा करताना वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहनस्वारांना मोठी कसरत करावी लागते. ही कसरत करत असताना वारंवार छोटेमोठे अपघात घडत आहेत.
याची गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता रहदारी पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
'रस्ता आहे की ट्रक टर्मिनल'
बेळगाव-बेळगुंदी रस्त्यावरील बेनकनहळळी ट्रक पार्किंग
रस्त्यावर ट्रक लावल्याने वाहनधारकांना होतोय त्रास
छोट्या मोठ्या अपघातांची वाढली संख्या
यावर उपाय काढण्याची गरज pic.twitter.com/pSt3zmw74l— Belgaumlive (@belgaumlive) September 16, 2022