बेळगाव : गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे श्री गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षातील कसर यंदाच्या श्रीगणेशोत्सवात भरून निघाली असून शुक्रवारी श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशभक्त, प्रशासन, पोलीस विभाग सज्ज झाला आहे. उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी रोड मॅप म्हणजेच मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासंदर्भातील प्रशासकीय परिपत्रक प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे.
नरगुंदकर भावे चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होईल, त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदेखुट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, रामा मेस्त्री अड्डा, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर मंदिर ओव्हर ब्रिज मार्गावरून पुढे मिरवणुकीची सांगता होईल.
मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते १० सप्टेंबर रोजी शेवटची श्रीमूर्ती विसर्जन होईपर्यंत वाहतूक मार्गात पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. मिरवणूक काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
१) अशोक स्तंभ सर्कल- आरटीओ – चन्नम्मा सर्कल मार्गे कॉलेज रोडहुन खानापुरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनांसाठी संगोळी रायण्णा सर्कल येथून जुना पीबी रोड मार्गे कृष्णदेवराय (कोल्हापूर) सर्कल, एअर जंक्शन, सदाशिव नगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्या नगर बच्ची क्रॉस, गांधी सर्कल (अर्गन तलाव), शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल सर्कल), केंद्रीय विद्यालय क्र.2, शरकत पार्क मार्गे खानापुरा रोडला जाण्यासाठी ग्लोब थिएटर सर्कलकडून वाहतूक वळविण्यात आली आहे.
२) खानापूरहून शहराच्या बाजूने, महामार्गाकडे आणि गोगटे सर्कल पासून रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या वाहनांसाठी स्टेशन रोड, हेड पोस्ट ऑफिस मार्गे ग्लोब थिएटर सर्कल आणि शनिमंदिर सर्कलच्या डाव्या बाजूने शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल सर्कल), गांधी सर्कल (अर्गन तलाव), गणेश मंदिर(हिंडलगा रोड)च्या डाव्या बाजूने डांबरी रोड मार्गे राष्ट्रीय महामार्गाला वाहतूक जोडली जाईल.
३) जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक/ कांबळी खुट, पिंपळ कट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी सर्व वाहने जिजामाता सर्कल येथून थेट मध्यवर्ती बसस्थानकाकडे किंवा ओल्ड पीबी रोडने पॅटसन
शो-रूमच्या दिशेने पुढे जाऊ शकतात.
४) नाथ पै सर्कलकडून बँक ऑफ इंडिया – एसपीएम रोड, कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजवरून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बँक ऑफ इंडिया सर्कल च्या उजव्या बाजूच्या रस्त्याने आणि जुन्या पीबी रोडच्या दिशेने वाहतूक पुढे जाईल.
५) कपिलेश्वर मार्गे जुना पीबी रोड, व्हीएचआयआरएल लॉजिस्टिक, भातकांडे शाळा, रेल्वे ओव्हर ब्रिजवरून जाणारी सर्व प्रकारची वाहने संभाजी उद्यान, बसवेश्वर सर्कल खासबाग, नाथ पै सर्कल मार्गे रस्ता प्रवासासाठी खुला असेल.
६) जुना पीबी रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर मार्गे रेल्वे अंडर ब्रिजकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यश हॉस्पिटलजवळून भातकांडे शाळा/तानाजी गल्ली रेल्वे गेटजवळील डावीकडे/उजवीकडे वळण घेऊन पुढे जातील.
७) गुड्स शेड रोडने कपिलेश्वर ओव्हर ब्रिजकडे जाणारे सर्व वाहने एसपीएम रोड आणि मराठा मंदिराकडे जाणारी वाहने गोवावेस सर्कलच्या दिशेने मार्गस्थ होतील.
८) मिरवणुकीच्या मार्गात ज्या ठिकाणी दुहेरी वाहतुक मार्ग आहेत, तेथे एकेरी वाहतूक आणि एकेरी वाहतुकीच्या मार्गावर पूर्णपणे मिरवणुकीसाठी मार्ग वापरण्यात येणार आहे.
९) चन्नम्मा सर्कल ते मुख्य मिरवणुक मार्गावरील काकतीवेस रोड ते शनिवार खूट, शनिवार खुट गणपत गल्ली, कांबळी खुट, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर ओवर ब्रिज, कपिलेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूलारस्त्यावर आणि कॅम्पा परिसरातील हॅवलॉक रोड, कॅटल रोड, यंदेखुट ते देशपांडे खूट आणि पवन हॉटेलपर्यंत मार्गावर ९ सप्टेंबर दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची पार्किंगला बंदी आहे.
मिरवणुकीच्या दिवशी अशी आहे पार्किंगची सोय-
१) बेननस्मिथ कॉलेज मैदान.
२) वनिता विद्यालय, धर्मवीर संभाजी चौक, येथून देशपांडे खुट
३) धर्मवीर संभाजी चौकजवळील लिंगराज कॉलेज परिसरातील खुली जागा.
४) फिश मार्केटकडून इस्लामिया शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला.
५) मराठी विद्यानिकेतन मैदान [सीमोल्लंघन मैदान].
६) देशपांडे खुट ते गांधी सर्कल [अरगन तलाव] रस्त्याच्या एका बाजूला.
७) खंजर गल्ली
८) महाद्वार रोडवरील संभाजी उद्यान आदी ठिकाणी जनतेसाठी पार्किंची सोय करण्यात आली आहे.
मिरवणूक काळात वाहतूक मार्गात करण्यात आलेला बदल, नेमून दिलेल्या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करणे अनिवार्य असून या सूचनांचे उल्लंघन करून प्रतिबंधित ठिकाणी वाहने पार्क करण्यात आल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जनतेने बेळगाव शहर पोलिसांना सहकार्य करून मिरवणूक सुरळीतपणे पार पडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.