Saturday, December 21, 2024

/

26 पासून रोटरी मिडटाऊन दांडिया -गरबा महोत्सव

 belgaum

नवरात्र उत्सव म्हणजे प्रामुख्याने दांडिया महोत्सव. मात्र लकी ड्रॉ आणि छोट्या-मोठ्या स्पर्धां, बक्षिसांची लयलूट,मनोरंजन आणि दांडिया असे एकाच छताखाली आणत रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे दांडिया – गरबा फेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान मराठा मंदिर गोवावेस येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह ओरिएंटल स्कूल येथे सकाळी 7 ते 10 यावेळेत गरबा फेस्ट पार पडणार आहे.

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत विनायक नगर येथे दिव्यांगांसाठी शाळा बांधण्यात येत आहे आणि या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी म्हणून सदर दांडीया फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील सदस्यांसाठी महोत्सव खुला आहे. विशेषतः वयोगटानुसार विविध स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भाषण,चित्रकला,भावगीत,भक्ती गीत अशा स्पर्धा देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत यामुळे परिपूर्ण मनोरंजन आणि कलागुणांचे सादरीकरण करत हा दांडिया-गरबा फेस्ट रंगणार आहे.

रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील जक्कीरहोंड नजीकच्या ओरिएंटल शाळेतील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनामध्ये 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.Garba fest

सदर दांडिया -गरबा महोत्सवातील प्रवेशासाठी दैनंदिन एन्ट्री पास 300 रुपये आणि नऊ दिवसांचा एन्ट्री पास 2000 रुपये इतक्या शुल्कात उपलब्ध करण्यात आला आहे. दांडिया व गरबा प्रेमींनी या महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. विजय पुजार आणि सेक्रेटरी आनंद गुमास्ते यांनी केले आहे.

महोत्सवात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी आयोजन समितीच्या प्रमुख नीता बिडीकर (कुडतुरकर) -9448578228, सतीश मिठारे (9448123574), अनिल बागी (9845261999), प्रकाश डोळेकर (9448126185), सुभाष कट्टी (9448989540), उदयकुमार इडगल (8867341749) किंवा गिरीश कत्तीशट्टी (9448231305) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.