Wednesday, December 4, 2024

/

स्वावलंबी भारत घडवण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा : राज्यपाल थावरचंद गेहलोत

 belgaum

नव भारत, महान आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी नवीन पदवीधर तरुण-तरुणींनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी केले आहे.आज बुधवारी राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना राज्यपाल गेहलोत म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणामुळे नवा भारत निर्माण होण्यास मदत होणार आहे.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून आपण आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाला प्रगतीपथावर नेले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2022 च्या अंमलबजावणीसोबतच राणी चेन्नम्मा विद्यापीठ सर्वसमावेशक शिक्षण देत आहे. कमी कालावधीत चांगली शैक्षणिक कामगिरी दाखवल्याबद्दल त्यांनी कुलपती आणि संघाचे अभिनंदन केले.

यावेळी समाजसेवा क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन नगरविकास तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते व्ही.एच. रविचंदर वेंकटरामन यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’, अभिनेता आणि दिग्दर्शक रमेश अरविंद यांना चित्रपट क्षेत्रातील सेवेबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ आणि बिदर बसवत्व प्रचारक, कायका दासोह प्रचारक माता अक्का यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’. अन्नपूर्णा ताईंना त्यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील भरीव सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.Rcu gehlot

दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विषयांचा अभ्यास केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ४८ पीएच.डी पदव्या प्रदान करण्यात आल्या.

विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवीलेल्या एकुण 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.विद्यापीठातील विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या कला, वाणिज्य, शिक्षण व विज्ञान शाखेतील एकूण 163 विद्यार्थ्यांना रँक प्रमाणपत्र देण्यात आले.
दीक्षांत समारंभात खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य ईरण्णा काडाडी, राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे मूल्यमापन कुलपती प्रा.शिवानंद गोरनाळे, कुलपती प्रा.एम. हनुमंतप्पा, वित्त अधिकारी प्रा.डी.एन.पाटील, विद्यापीठ सिंडिकेट व शैक्षणिक परिषद सदस्य, विद्यार्थी व पालक समारंभात सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.