बेळगाव येथे मंगळवारी पहाटे छापे टाकल्यानंतर पी एफ आय सदस्यांना चौकशी करून अटक करण्यात आली आहे.
बेळगाव पोलिसांनी डीसीपी रवींद्र गडाडी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी बेळगावीतील पीएफआय सदस्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकले.
मंगळवारी पहाटे ४ वाजता छापेमारी सुरू झाली असून, पुढील तपासासाठी 7 जणांना ताब्यात घेण्यात आले होते स्थानिक पीएफआय नेत्याची खडेबाजार/मार्केट पोलीस हद्दीत चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी पीएफआय कार्यकर्त्यांनी राज्यातील पीएफआय नेत्यांच्या घरावर ईडीच्या छाप्याच्या निषेधार्थ काकती बेळगावीजवळ अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. पोलीस आणि पीएफआय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.
एकूणच बेळगावातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव पोलिसांनी पी एफ आय कार्यकर्त्यांवर कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.