वरेरकर नाट्य संघ ,लोकमान्य ग्रंथालय आणि मंथन कल्चरल अंड सोशल वेलफअर सोसायटी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सुप्रसिद्ध साहित्यिक कै जी ए कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘कथा जीए’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रम वरेरकर संघाच्या के बी कुलकर्णी कलादालनात दिनांक 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची संकल्पना,कथांचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन श्रीमती मेधा मराठे यांचे होते.कार्यक्रमामध्ये अर्चना ताम्हणकर, सुधीर शेंडे ,चिन्मय शेंडे ,प्रिया काळे, नुपूर रानडे, विद्या देशपांडे यांचा सहभाग होता.
जीएंच्या साहित्याचा, व्यक्तिमत्त्वाचा निवेदनामध्ये आढावा घेत त्यांच्या ऑर्फियस, राधी आणि चैत्र या कथेचे नाट्य अभिवाचन करण्यात आले.
जीएंनी म द हातकणंगलेकर, जयवंत दळवी, अमोल पालेकर, श्री पु भागवत यांना लीहीलेल्या निवडक पत्रांचे वाचन करण्यात आलेसुरुवातीला जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. शोभा लोकुर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आलाकार्यक्रमाला रसिकांची उपस्थिती होती