शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत सापडले असून बेळगाव शहरालगतच्या बसवण कुडची गावात रविवारी दोन बैलांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या भागांत हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे पशुधन हीच त्यांची संपत्ती आहे. यामुळे पशुधन शेतकरी पशुधनाची विशेष काळजी घेतात मात्र अचानक झालेल्या दोन बैलांच्या मृत्यूमुळे पशुधन जपण्याची गरज बनली आहे विचित्र आजाराने बसवून कुडची येथे बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नामदेव मुतगेकर ,तानाजी गल्ली बसवन कुडची यांचा बैल अचानक मरण पावला त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सचिन खोकलेकर , मेन रोड बसवण कुडची यांचा बैल अचानक मयत झाला दिवसाआड दोन बैल दगावले आहेत त्यामुळे या भागांतील जनावरांना विचित्र आजाराने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बसवन कुडची गावात अजून 16 हून अधिक बैलांना या रोगाची लागण झाली अनेक जनावरे दगावली आहेत त्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बाब यांना समजताचं बेळगावचे पशु वैद्यांनी मयत बैलाचे शव विच्छेदनाचे नमुने बंगलोरला पाठवले आहेत.बसवण कुडची, निलजी, बसरिकट्टी, शिंदोळी, मुचंडी, सांबरा आजू बाजूच्या गावात या रोगाची जास्त लागण झाली आहे . बसरीकट्टी या गावांमध्ये देखील दोन बैल दगावले आहेत .रोगाची लागण झालेल्या बैलांना बाजूच्या जनावरांना रोगाची लागण होऊ नये म्हणून काहीं मालकांनी दुसऱ्या जागी हलवले आहे .