बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत ‘दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -2022’ भव्य स्वरूपात येत्या बुधवार दि. 28 सप्टेंबर ते रविवार दि. 9 ऑक्टोबर या कालावधीत शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानावर साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय सांस्कृतिक परंपरेसह क्रीडा व सामाजिक समरसता कायम ठेवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यासाठी आकर्षक बक्षीसं पुरस्कृत करण्यात आली आहेत
पहिल्या दिवशी 28 रोजी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडेल. यावेळी संध्याकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत गरबा आणि दांडिया कार्यक्रम होणार असून 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान गरबा आणि दांडिया मधील बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट कपल, बेस्ट ग्रुप, बेस्ट इंडिव्हिज्युअल या आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. गरबा -दांडियासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा विविध गटात घेतली जाईल. छोटा गटांमध्ये इयत्ता दुसरीपर्यंत विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. भारताचा तिरंगा आणि नैसर्गिक चित्र हा स्पर्धेचा विषय असेल.इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ भारत अभियान, एसआरओ स्पेस शटल तसेच इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत गटासाठी हर घर तिरंगा आणि भाजी मार्केट हा विषय असणार आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी भारतीय सेना, दांडिया रास हा विषय देण्यात आला आहे. सदर स्पर्धा दुपारी 3 वाजता सुरू होणार असून स्पर्धकांनी अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर एक तासाच्या स्पर्धेसाठी ड्रॉइंग पेपर आयोजक देण्यात येणार असून रंग वगैरे इतर साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे. या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत गरबा आणि दांडिया पार पडणार आहेत.
सोमवार दि. 3 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत चार गटांमध्ये गाण्याची स्पर्धा होईल. पहिला गट इयत्ता सातवी पर्यंत चौथीपर्यंत, दुसरा गट इयत्ता सातवी पर्यंत, तिसरा गट इयत्ता दहावी पर्यंत आणि चौथा गट कॉलेज विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. स्पर्धेसाठी चार मिनिटाची वेळ असून फक्त भक्ती गीत, भावगीत व देशभक्तीपर गीत सादर करणे आवश्यक आहे. मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत दांडिया पार पडणार आहे. यानंतर बुधवार दि. 5 रोजी विजयादशमी सिमोल्लंघन कार्यक्रम कॅम्प येथे होईल. गुरुवारी 6 रोजी दुपारी 3 वाजता सिने संगीतावर आधारित चार गटांमध्ये नृत्य स्पर्धा होईल. सदर स्पर्धा पहिला गट इयत्ता तिसरीपर्यंत, दुसरा गट इयत्ता सातवी पर्यंत, तिसरा गट दहावीपर्यंत, चौथा गट कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी तर पाचवा गट ओपन अर्थात सर्वांसाठी खुला असणार आहे.
या खेरीज बेळगावातील सर्व शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनीकडून राष्ट्रभक्त नेत्यांच्या जीवनावरील नाटक प्रदर्शन होणार असून प्रत्येक नाटक 8 मिनिटांचे असेल. संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत हे नाट्य प्रदर्शन होणार आहे. शुक्रवार 7 ते शनिवार 8 ऑक्टोबर सलग दोन दिवस दुपारी 4 ते 6 या वेळेत खुली ऐतिहासिक भव्य ढोलताशा स्पर्धा होणार रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 पासून ढोल ताशा स्पर्धेची अंतिम फेरी, बक्षीस वितरण आणि सत्कार सोहळ्याने दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -2022 ची सांगता होईल. महोत्सवा संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शंकर (9738424348), सुदर्शन (7019407320), विजय (7411977306), अथवा अनुराग (9663364290) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.