बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या सीआयएससीई स्विमिंग नॅशनल गेम्स -2022 या क्रीडा महोत्सवातील जलतरणामध्ये बेळगावच्या स्विमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्णपदकांसह एकूण 7 पदकांची कमाई करत स्पृहणीय यश मिळवले आहे.
पडूकोण -द्रविड स्पोर्ट्स अकॅडमी सेंटर बेंगलोर येथे 21 ते 23 सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या उपरोक्त क्रीडा महोत्सवात स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या सुनिधी हलकरे, समृद्धी हलकरे आणि गाथा जैन या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावून बेळगावच्या नावलौकिकात भर घातली आहे.
सुनिधी हलकरे हिने 200 मी. व 100 मी. बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक आणि 50 मी. बॅक स्ट्रोकमध्ये कांस्य पदक मिळविले. समृद्धी हलकरे हिने 50 मी. बॅक स्ट्रोकमध्ये कांस्य पदक व 200 मी. बॅक स्ट्रोकमध्ये रौप्य पदक तर गाथा जैन हिने 100 मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक आणि 50 मी. बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या तीनही जलतरणपटू शहरातील ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उपरोक्त यशस्वी जलतरणपटू केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याचा सराव करतात त्यांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन तसेच केली.
सोसायटीचे चेअरमन डॉ प्रभाकर कोरे, डॉ विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे व प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.