दसऱ्याच्या निमित्ताने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा मैदानावर होणाऱ्या बेळगाव शहराच्या पारंपरिक दसरा आणि सीमोल्लंघनाचे आयोजन करण्यासाठी शहर देवस्थान पंच कमिटीची बैठक चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिरात पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील होते.
शहरातले सर्व देवस्थानांचे हकदार, पुजारी, पालखी, सासनकाठी आदींनी उपस्थिती दर्शवली होती सर्व देवस्थानांच्या पालख्या व सासनकाट्या यांनी वेळेत 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले.
सर्वांनी शांत रीतीने हा उत्साह साजरा करा असे आवाहन रणजित चव्हाण पाटील यांनी केलेउत्सव दरम्यान पालखी व देवस्थानांच्या काय अडचणी असतील त्या देवस्थान मंडळाकडे कळवाव्या असे सांगण्यात आले.
बैठकीलाअध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर ,परशराम माळी प्राचार्य आनंद आपटेकर ,लक्ष्मण किल्लेकर ,सुनील जाधव ,बाबू पुजारी ,अभिजीत चव्हाण राजू भातकांडे ,नाना अष्टेकर, अशोक कंग्राळकर ,प्रथमेश अष्टेकर आदी उपस्थित होते.
बेळगाव शहराच्या 18 गल्लीचा मिळून पारंपरिक दसरा विध्या निकेतन मैदानावर साजरा केला जातो सोने लुटण्याची परंपरा आहे शहरातील मुख्य मंदिरातून पालख्या एकत्र येत असतात शिवाय चव्हाट पालखी आणि मानाचा कटला मिरवणुकीने मैदानावर दाखल होत असतो हजारो बेळगावकर या ठिकाणी उपस्थित असतात.श्रीराम सेनेच्या वतीनं भव्य करेला स्पर्धा घेतली जाते