Tuesday, December 24, 2024

/

मराठा बँकेची 80 वी वार्षिक सभा खेळीमेळीत

 belgaum

मराठा बँकेची 80 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले.

व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगती बाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2021-2022 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट वर्ग मिळाला आहे व बँकेला यावर्षी निव्वळ नफा रुपये 2 कोटी 61 लाख झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी 31 मार्च 2022 अखेर अहवालाचे तसेच इतर सभेपुढील विषय वार्षिक अहवाल ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी अंदाजपत्रक घटनादुरुस्ती व अन्य विषयांचे तपशीलवार वाचन करून सविस्तर माहिती दिली.Maratha bank

बँकेचे सभासद मालोजीराव अष्टेकर,ईश्वर लगाडे,अजित यादव,सुरेश जाधव,मारुती पाटील,अशोक कांबळे,दत्ता नाकाडी, अमित देसाई, नानासाहेब पाटील व इतरांनी चर्चेमध्ये भाग घेऊन एकमताने अहवालाला मंजुरी दिली.

यावेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर,एल एस होनगेकर,बी एस पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर,सुशीलकुमार कोकाटे,विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्‍मण नाईक, रेणू किल्लेकर, नयन मिरजकर,बी.बी खंडागळे, जयराज मोदगेकर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी व्हाईस चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.