Wednesday, April 24, 2024

/

सलग 21 तास live: बेळगाव live पोचले पोर्तुगाल पासून कतार पर्यंत

 belgaum

बेळगाव live म्हणजे लाखो बेळगावकर नागरिकांचा आवाज. हा आवाज पोचलाय साता समुद्रापार. सलग 21 तास बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिवणुकीसाठी महा live कव्हरेज च्या माध्यमातून…. हे बेळगाव live ची गरुड भरारी, बेळगावची महती सर्वदूर पसरवण्यासाठी,बेळगावची कीर्ती जगभर पोहोचविण्यासाठी आणि बेळगावचा डंका जगभर गर्जवण्यासाठी…..यातून आता एकच साध्य करायचं आहे…… माझं बेळगाव…..मी बेळगावचा आणि मी मोठ्ठं करणार माझं बेळगाव….

बेळगावच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. मुंबई आणि पुण्यानंतर फक्त बेळगावांतच अशी मिरवणूक होते आणि ती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल होतात. जे दाखल होतात ते प्रत्यक्ष डोळ्यांनी ही मिरवणूक पाहू शकतात .

मात्र ज्यांना गणेशोत्सवासाठी बेळगावला येता येत नाही त्यांचे काय? अशांसाठी लाईव्ह कव्हरेज च्या माध्यमांतून बेळगाव live ने सातत्याने एकवीस तास लाईव्ह मिरवणूक दाखवण्याचा उद्देश हाती घेतला. याला तांत्रिक टीमची मदत लाभली आणि कोणताही खंड न पडता सलग 21 तास बेळगावची सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक साऱ्यांनाच पाहता आली.

 belgaum

आजारपणामुळे, अधूपणामुळे घराघरात अडकलेले नागरिक असो, परीक्षा किंवा इतर कारणांमुळे प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभाग न घेता येणारे बेळगाव आणि परिसरातील गणेश भक्त असोत किंवा देश आणि विविध परदेशात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अडकलेले बेळगावकर नागरिक असोत या साऱ्यांसाठी हे लाईव्ह कव्हरेज घरबसल्या बाप्पाचे दर्शन घडवणारे ठरले.Ganesh immersion

विविध प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्याचे प्रत्यंतर आले आणि बेळगाव लाईव्ह चा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थ ठरला. पोर्तुगाल, कतार, तुर्की अमेरिका, इंग्लंड, लंडन ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातून ही मिरवणूक पाहून बेळगाव लाईव्ह चे आभार मानणाऱ्या असंख्य कॉमेंटनी बेळगाव लाईव्ह वर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि यातूनच साध्य झाले मुख्य उद्दिष्ट.

या मिरवणुकीला विश्लेषक म्हणून लाभलेले साहित्यिक गुणवंत पाटील असोत किंवा पत्रकार प्रसाद सु प्रभू असोत या साऱ्यांनीच बेळगाव परिसर,बेळगावची परंपरा बेळगावचे क्रीडासाहित्य क्षेत्र, रूढी ,शेती गाजलेले पैलवान, धर्म यांचा आढावा घेत विधायक गणेशोत्सवाची परंपरा, बेळगावचा इतिहास आणि बेळगावची एकंदर वाटचाल, गणेशोत्सव आणि त्यातून घडलेले कार्यकर्ते, साध्या गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ते राजकीय पक्षांचा सदस्य, मोठा समाजसेवक अशा अनेक गोष्टींची नोंद या लाईव्ह मध्ये घेतली आणि यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. विशेषत्वाने चर्चा झाली ती पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव नेमका कसा असावा या संदर्भात. गणेश मूर्तीची उंची असो, गणेश मंडपाची उंची असो ,रहदारीची कोंडी असो… मूर्ती शेड्यूच्या मातीची की प्लास्टर ऑफ पॅरिसची, वाद्यांचा गजर पारंपारिक की डॉल्बीचा या साऱ्या गोष्टींना चर्चेच्या माध्यमातून बळ मिळाले आणि बेळगाव live ला मिळाले आणखी एक नवीन उद्दिष्ट.

पुढील वर्षी गणपतीच्या तोंडावर चर्चा करण्यापेक्षा आतापासूनच चर्चा करून एक चांगला विधायक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहीम आता बेळगाव लाईव्ह हाती घेत आहे. मिरवणुकीत वेळेत सहभाग आणि मिरवणूक विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत चालत न राहता पहाटेपर्यंतच कशी संपवावी या गोष्टींचा उहापोह ही बेळगाव लाईव्ह करणार आहे.Logo belgaum live

मूर्तिकारांनी मूर्ती बनवल्यानंतर मूर्तीच्या उंचीची चर्चा न करता प्रारंभीच गणेश मंडळांनी ऑर्डर देण्यापूर्वी मूर्ती कशी असावी याची अचूक व्यवस्था आतापासूनच करून बेळगाव लाईव्ह हे गणेश मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी आणि प्रशासन यांचा एक दुवा होण्याचे काम करणार आहे. या महा कव्हरेज च्या माध्यमातून इतके सारे साध्य झाले आणि बरेच काही साध्य होईल….. याचेच समाधान!

Live साठी विशेष आभार (live युनिट कॅमेरामन)
प्रो लिंक व्हिज्युअल मीडिया
प्रतीक नाईक
विनायक होसूरकर
संतोष बाचीकर
प्रवीण नायडू
संदीप गावडे
विशाल पावशे
नागेश कालिंग
स्वप्नील जे
संजय चौगुले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.