बिबट्याचे दर्शन होऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे.तरीदेखील बिबट्या जेरबंद झालेला नाही गणेशोत्सवामुळे मागील दोन दिवसापासून बिबट्याची शोध मोहीम बारगळली आहे.परिणामी वीस दिवसापासून बंद असणाऱ्या काही शाळा मात्र अजूनही बंदच आहेत.यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे असा प्रश्न पालकांमधून उपस्थित आहेत.
बिबट्या काही सापडेना आणि शाळा काही सुरू होईना अशी स्थिती झाली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान आला जबाबदार कोण असे म्हणत पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून ते भरून काढताना पालकांबरोबरच शिक्षकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे.गुरुवारी पासून केंद्रीय विध्यालय सारख्या काही शाळांनी पालकांकडून हमी पत्र घेत शाळा सुरू केल्या आहेत बऱ्याच शाळा अध्याप बंद असून ऑनलाइनवर निर्भर आहेत.
त तब्बल वीस दिवसापासून शाळा बंद असल्यामुळे सदर 22 शाळांमधील 10000 हून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या शोधात वन विभाग मागील 25 दिवसापासून त्या ठिकाणी तळ ठोकून आहे तरीदेखील बिबट्याला जेरबंद करणे शक्य झालेले नाही.
या 20 दिवसात केवळ दोन ते तीन वेळाच बिबट्या निदर्शनास आला आहे . मात्र मागील वीस दिवसांपासून शाळा बंद ठेवण्यात आले आहेत यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी देखील त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सदर शिक्षणाचे गांभीर्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे यामुळे शाळा सुरू कराव्या अशी मागणी पालकांमधून केली जात आहे
विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊनच शाळा बंद करण्यात आले आहेत.मात्र पालकांच्या परवानगीपत्रा नुसार पालकांच्या जबाबदारीवरच शाळा सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे . गोंगाट आणि वाहनांचा आवाज यामुळे बिबट्या अथवा वरदळीच्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून येणार नाही. यामुळे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे.
आपल्या जबाबदारीवर आम्ही शाळेत पाठवू असे देखील मत व्यक्त होत आहे विद्यार्थी एकदा शाळेच्या गेटच्या आवारात गेल्यानंतर शाळा सुटल्यावरच विद्यार्थी शाळेबाहेर पडतात यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही नुकसान होणार नसून शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी केली जात आहे.
महिनाभराच्या कालावधीत देखील बिबट्या जेरबंद झाला नसून वीस दिवसापासून शाळा बंद आहेत.यामुळे दररोज बिबट्या सापडला नाही उद्या शाळा बंद अशी मानसिकता विद्यार्थ्यांची तयार झाली असून शिवाय कोरोनामध्ये ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना झोपली होती मोबाईलची सवय लागली होती आणि पुन्हा बिबट्या मुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत शिवाय मोबाईल साठी इंटरनेट तसेच नोट्स च्या झेरॉक्स यासाठी पालकांना आर्थिक उदंड भूरदंड सहन करावा लागत आहे. तसेच अवघ्या महिनाभरात दसरा आला असून विद्यार्थ्यांना दसऱ्याची सुट्टी असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून मिशन बिबट्यासाठी बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.