Friday, December 20, 2024

/

कणबर्गी तलावाच्या ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्स!

 belgaum

बेळगाव शहरा नजीकच्या कणबर्गी तलावाची देखभाल आणि तेथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याच्या दृष्टीने एजन्सीची निवड करण्यासाठी बेळगाव महापालिकेच्यावतीने मनपा आयुक्तांनी प्रस्ताव (आरएफपी) मागविले आहेत.

कणबर्गी तलाव येथे उपलब्ध करावयाचे उपक्रम : प्रकल्प चालकाने किमान पुढील उपक्रम उपलब्ध केले पाहिजेत. जलविहारासाठी 8 दोन आसनी पेडल बोटी आणि 4 चार आसनी पेडल बोटी तसेच छत असलेल्या 4 चार आसनी रोईंग बोटी.

कणबर्गी येथील प्रकल्प स्थळाचे एकूण क्षेत्र 9.7 एकर इतके असून येथे दोन बगीचा कुंज, चार खाद्यपदार्थांची दुकाने, व्यायामा करता खुली जागा, मुलांसाठी खेळाची जागा, टेहळणी मनोरा (वॉच टॉवर), चालण्याच्या व्यायामासाठी सुमारे 900 मी.Kanbargi lake

फूटपाथ, मुताऱ्या, ओपन एअर थिएटर, स्टोअर रूम तिकीट काउंटर, बोअरवेलद्वारे सिंचन व्यवस्था, घाट, पथदीप, पार्किंगची जागा वगैरे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरवासियांसाठी मनोरंजनाचे उत्तम केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

उपरोक्त गोष्टी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रकल्प चालकाने पुरेशी सुरक्षा तसेच शोध व बचाव उपकरणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यामध्ये वैयक्तिक तरंगण्याची उपकरणं, हेल्मेट, बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी असणारा पट्टा (लाईफबॉय्स), प्रथमोपचाराचे किट आणि तांत्रिक तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे बचाव बोटी पुरवल्या पाहिजेत.

सदर प्रकल्पासाठीचा करार 3 वर्षाच्या कालावधीसाठी असणारा आहे. मात्र एकंदर कार्यपद्धती लक्षात घेऊन महापालिकेकडून त्याचे दरवर्षी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत नूतनीकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.