सीमाप्रश्न खटल्याच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बेळगावला धावती भेट देऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींशी चर्चा केली.
बेळगाव विमानतळावरून आजऱ्याला रवाना होण्यापूर्वी सीमाप्रश्नी नियुक्त तज्ञ समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी सकाळी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या समवेत शहरात दाखल होऊन समितीच्या नेते मंडळींची भेट घेतली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निवासस्थानी आदरातिथ्य स्वीकारल्यानंतर जयंत पाटील यांनी उपस्थित नेतेमंडळींशी महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची सध्याची स्थिती आणि महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती याबाबत चर्चा केली.
याप्रसंगी चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि दीपक दळवी यांच्यासह समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
आगामी 15 सप्टेंबर दरम्यान मुंबई मुक्कामी तज्ञ समिती आणि उच्च अधिकार समितीची बैठक होणार आहे त्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत याशिवाय 23 नं 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील महत्त्वाच्या सुनावनी विषयी देखील यावेळी चर्चा झाली.